topics1

topics
भाषिक विकासाची प्रक्रिया

१.भाषा आणि मानवी जीवन याचा सबंध :
१.परस्पर सबंध .
२.आर्थिक व राजकीय व्यवस्था.
३.विचाराची देवाण घेवाण.
४.समाज निर्मिती.
५.संस्कृती .
६.विचार व भावना प्रगटीकरण.
७.आत्म प्रगटीकरण.
८.सामाजिक एकता.
९.राष्ट्रीय एकता.
१०.मातृभाषेच्या उद्दिष्टाची सध्याता.
२.भाषा विकास ही शरीर मानस प्रक्रिया आहे:
१.ऐकणे ,बोलणे ,वाचणे,लिहणे हा भाषेचा क्रम .
२.यासाठी शरीरातील निरनिराळ्या अवयाचा सहभाग आवश्यक आहे.
३.बुद्धी ,भावना,कल्पना ह्या मानसिक क्रिया ही घडणे व विचार प्रक्रियासाठी मेंदूचा उपयोग .
४.शरीर व मन यांच्या सुसंवादातून भाषा विकास म्हणून भाषा विकास ही शरीर मानस प्रक्रिया होय.
५.परिपक्वता .
६.तत्परता.
७.कृतिशीलता.
भाषा विकासासाठी आवश्यक आहे.

३.भाषा शब्द आणि निशब्द :
१.व्याख्या : शब्दविना केवळ हावभाव ,खुणा,संकेत ,हातवारे,विश्रम,ह्या द्वारे मनातील विचार व्यक्त करणे त्यास निशब्द भाषा म्हणतात.
भाषेच्या पायऱ्या :
१.शरीराच्या अवयवाची हालचाल व हाताच्या खुणा ही पहिली भाषेची पायरी.
२.ध्वनी किंवा आवाज भाषा.
३.शब्दाची भाषा:-शब्दा मुळेच भाषेला व विचार प्रगटीकरणाच्या प्रक्रियेला विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे.
४.लिपी बद्ध भाषा: बोली भाषेतील शुध्द स्वरूप ओळखण्यासाठी भाषा लिपीबद्ध असावी .
५.मुक्या व बहिरयाशी संवाद करतांना निशब्द भाषेचाच उपयोग होतो.

४.मातृभाषेतून अभिवृत्ती विकास :
१.आपली बुद्धी ,भावना ,कृती भाषेवर केंद्रीत करणे म्हणजे अभिवृत्ती होय.
२.भाषेमुळे अभिवृत्ती विकास साधना येतो .
३.अभिवृत्ती मुळे बुद्धी ,भावना ,कृती भाषेवर केंद्रीत होते.
४.वाड्मयाविषयी आवड व शैली युक्त भाषाचा उपयोग करता येतो.

५.भाषेचा भावनात्मक विकास :
१.मानसिक विचार इतकी दुसरी बाजु भावनात्मक विकासाची आहे.
२.भाषेमुळे विचाराची जागृती व भावनाचे उद्दीपन होते.
३.विचार चेतवण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये आहे .
४.सुभास चंद्र बोस : -तुम मुझे खुन दो,मै तुम्हे आजादी दुंगा !
६.बालकाचा व्यक्ती महत्व विकास :
१.व्यक्ती महत्व विकासाला भाषा घटक कारणीभूत आहे .
२.व्यक्ती महत्व ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
३.मुलांना जीवन परिचय करून देण्याचे कार्य भाषेचे आहे.
४.मुलांना आई कडून मिळालेले भावना संबंधीचे मंत्र ,प्रीती,भीती,राग,लोभ ,खेद.
५.मुलांचे अनुभव क्षेत्र .
६.वय,भाषा,अनुभव याचा वाढ व विकास एकाच वेळी होतो.
७.मुलांची भाषा ही त्याचा व्यक्ती महत्वाचा आरसा आहे.

७.परिसर व परिवार यांचा भाषा विकासावर होणारा परिणाम :
१.सामाजिक परिसराचा पहिला घटक कुटुंब आहे.
२.परिवार हीच मुलांची पहिली शाळा आहे.
३.परिवारातील लोकाचे अनुकरण करून मुलं भाषा शिकते .
४.परिवाराने चांगल्या लोकांच्या परिसरात राहावे.
५.परिसरातील लोकांचे मुल अनुकरण करते.
६.ग्रामीण व शहरी मुलांमध्ये भाषा विकास बाबतीत फरक आढळते.
७.परिसर व परिवार यांचा भाषा विकासावर अपरिहार्य परिणाम होत असतो.

८.मातृभाषेचे सांस्कृतीक विकास व सामाजिक विकास ऐक्य या दृष्टीने महत्व:
१.मातृभाषेमुळे संस्कृती जोपासता येते.
२.मातृभाषेवर प्रेम असणारे आपल्या संस्कृतीवर परिणाम होणार नाही यांची काळजी घ्यावी .
३.समान भाषा बोलण्यामध्ये जवळीक लवकर निर्माण होते.
४.मातृभाषा ही स्व भाषा आहे म्हणून कोणीही मातृभाषेतून विचार करतो.
५.एक भाषा ,एक धर्म,एक संस्कृती असे समीकरण निर्माण होणे आवश्यक आहे.
६.भाषा ही शिक्षणाची गंगोत्री आहे.


९.मातृभाषेचे शिक्षणातील स्थान :
१.मातृभाषा हे शिक्षणाचे नैसर्गिक माध्यम आहे.
२.विद्या पीठातील मुलांची प्रगती इंग्रजी मध्यमा मुळे कमी होते.
३.व्यक्ती विकास व जीवन यशस्वी जगण्याची कला म्हणजे भाषा होय.
४.मातृभाषेमुळे ज्ञान घटकाचे ग्रहण व आकलन होते.
१०.प्रमाण भाषा :
न अडखळता अस्सखलीतपणे बोलली जाणारी भाषा म्हणजे प्रमाण भाषा होय.
भाषेचे प्रकार: १.बोली २.लेखी .
बोली भाषेतील शुद्ध स्वरूप ओळखण्यासाठी भाषा ग्रांथिक व्याकरण ,एकरूपता विवादाचा निकाल साधणारी असावी.
११.प्राथमिक अवस्थेत मुल भाषा शिकण्याची पद्धत :
१.बेदी व लेबर्ग याने मुलांच्या महिण्यानुसार अवस्था मांडून बोलण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत.मुलांची पाहिली भाषा रडणे आहे.आई आपल्या तहनुल्या सोबत सतत काही बडबडत असते व ही बडबड मुल श्रवण करते .
२.श्रवण करता करता भाषेचे आकलन होते.
३.एकल्या नंतर बोलायला येते.
४.वाचनासाठी स्वच्छ वाणीं ,स्पष्ट शब्दोच्चार व योग्य स्वराघात याची आवश्यकता आहे.
५.वाचन कौश्यातुन लेखन कौशल्य विकसीत होते.
६.बालक भाषा अनुकरणातुन शिकते.

१२.भाषा विकासाचे टप्पे :
१.श्रवण : कान ७० टक्के ज्ञान.
२.भाषण :-ओठ,टाळू,जीभ,कंठ ,स्वरयंत्र.
३.वाचन :-वरील सर्व व डोळे.
४.लेखन : हाताची बोटे व डोळे.
१३.भाषा विकासावर परिणाम करणारे घटक :
१.आरोग्य : मुल निरोगी असले तर लवकर बोलेल .
२.परिस्थिती : मुल ज्या परिस्थितीत वाढते तसीच भाषा शिकत असते.
३.बुद्धिमत्ता : सर्वाची बुद्धिमत्ता सारखी नाही.
४.परिपक्वता : इंद्रियाचा विकास जोपर्यंत होत नाही तो पर्यंत भाषा येत नाही.
५.सामाजिक व कौटुबिक संबध : समाजाचे व कुटुंबाचे संबध प्रेमाचे जीवाळ्या चे अपुलीकीचे हवे आहेत.
६.शाळा : शाळा भाषा विकास घडविणारे महत्वाचे केंद्र आहे.
१४.भाषा विकासाचे तत्वे :
१.रडणे किंवा रुदने : ही मुलाची पहिली भाषा.
२.अंग विक्षेप किंवा हावभाव : शब्द नसतात तेव्हा भाषेचे कार्य करण्यास अंगविक्षेप कामास येतात म्हणून अंगविक्षेप ही एक प्रकारची भाषाच आहे.
३.अनुकरण : मुल भाषा अनुकरणाने शिकते.
४.सराव किंवा वापर : भाषा प्रत्यक्ष वापरे पर्यंत येत नाही .
५.सवय : सवय होण्यासाठी सराव आवश्यक व सराव होण्यासाठी पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे.
१५.शब्द संपत्तीच्या विकासासाठी उपाय :
१.समानर्थी शब्द व विरुद्धाअर्थी शब्द .
२.वस्तू व वस्तूचा परिचय .
३.बालगीते ,समूहगीते,बडबड गीते,बालनाट्य.
४.गप्पा गोष्टी ,गाणी ,पाठांतर ,भेंड्या ,अंताक्षरी,कोडी,उखाणी.
५.खेळ व सहली.
१६.भाषा विकासासाठी योजावयाचे उपक्रम बालवाडीतील मुलांसाठी :
१.बालगीते,समूहगीते,बडबडगीते,बालनाट्य.
२.गप्पा गोष्टी,गाणी,पाठांतर,भेंड्या,अंताक्षरी,कोडी,उखाणी.
३.वस्तू व वस्तूचा परिचय म्हणून बालवाडीतील त्रिपदी
१.वस्तूचे नाव सांगणे.
२.वस्तू दाखवणे.
३.वस्तू दाखवून नाव विचाराणे .

१७.भाषा विकासासाठी योजावयाचे उपक्रम प्राथमिक शाळेतील मुलांसाठी :
१.चांगली भाषणे ऐकवणे व चांगली भाषणे करायला लावणे.
२.ग्रंथालयात चांगली पुस्तके वाचायला लावणे व त्यातून निबंध लिहिण्यास सांगणे .
३.शाळेतील वार्ताफलक लिहिण्यास सांगणे व वर्गातील फलकावर सुविचार लिहिण्यास सांगणे.
४.हस्ताक्षत स्पर्धा ,पाठांतर स्पर्धा,निबंध स्पर्धा घेणे.
मुख्य पृष्ठ