topics7

topics7
पाठ्यक्रमाचा अभ्यास
१.मातृभाषा शिक्षणाचे सर्वसामान्ये उद्दिष्टे :
१.विद्यार्थाला अर्थपूर्ण ऐकण्याची सवय लावणे .
२.विद्यार्थांना उच्चार ,स्वराघात ,विराम,स्वरातील चढ-उतार गति,उंची ,व्यंजन भेद लक्षात घेऊन भाषण –संभाषण येणे.
३.विद्यार्थांना सुस्पष्ट वाचन,योग्य आरोह व अवरोह ,स्वराघात ,गति,लय,योग्य हावभाव करून वाचन करता येणे.
४.विद्यार्थांना सुवाच्च व वळणदार अक्षरात लेखन करता येणे.
५.कार्यात्मक व्याकरण शिकता येणे.
६.स्वयंअध्ययन करता येणे.
७.भाषेचा व्यहारात उपयोग करता येणे .
८.ऐकून व वाचून संकल्पना समजून घेता येणे.
९.शब्द संपत्तीवर प्रभुत्व मिळवतात येणे.
१०.विद्यार्थाचा सर्वांगीण विकास घडून आणणे.

२.पाठ नियोजनातील उद्दिष्टाचे स्पष्टीकरणे :
१.ज्ञान : स्मरण करतो, माहिती सांगतो,पाठ केलेले म्हणतो,वर्णन करतो.
२.आकलन : तुलना करतो,फरक सांगतो,जोड्या जुळवतो,साम्यभेद मांडतो.
३.उपयोजन : प्रमेय सोडतो,उदाहरणे सोडवतो,पाठ्यपुस्तक वाचून स्वतच्या भाषेत लेखन करतो.
४.कौशल्य : नकाशा काढतो,नकाशा भरतो,आकृत्या काढतो,रचना करतो.
५.अभिरुची : आवडीने कृती करतो ,रमून जातो,संग्रह करतो,गाणी व गोष्टी म्हणतो.
६.अभिवृत्ती : विद्यार्थाचा एखाद्या गोष्टीकडे ज्ञानात्मक ,भावात्मक ,क्रियात्मक कल आहे.




३.पाठ्यपुस्तकाचे महत्व :
१.पाठ्यपुस्तक हे साध्य नव्हे ते एक साधन आहे.
२.पाठ्यपुस्तक शिक्षक विद्यार्थाचा मित्र आहे.
३.पाठ्यपुस्तकामुळे उद्दिष्टे गाठण्यास मदत होते.
४.पाठ्यपुस्तकामुळे विद्यार्थी क्षमता प्राप्त करण्यास मदत होते.
५.पाठ्यपुस्तकात संपूर्ण अभ्यासक्रमाचे दर्शन होते.
६.पाठ्यपुस्तकामुळे पालकांस घरी आपल्या पाल्याला शिकविता येते.

४.उत्कृष्ट पाठ्यपुस्तकाचे निकष :
१.पाठ्यपुस्तक हे अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असते.
२.पाठ्यपुस्तकातील भाषा विद्यार्थाच्या वयानुसार असावी.
३.योग्य त्या मजकुरानुरूप आवश्यक तिथे आकृत्या असाव्यात .
४.पाठ्यपुस्तकाची मांडणी तर्कसंगतपणे असावी. बहिरंग,अंतरंग
४.पाठ्यपुस्तकाचे परीक्षण विश्लेषण करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करतांना अधिबहिरंगाचे परीक्षण करणे.
२.पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करतांना बहिरंगाचे परीक्षण झाल्यावर अंतरंगाचे परीक्षण करावे.
३.पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ रंगीत चित्राने युक्त असावे.
४.पाठ्यपुस्तकाची प्रस्तावना मोजक्या शब्दात असावी.

१.पाठ्यपुस्तकाचे बहिरंगानुसार निकष :
१.मुखपृष्ठ : आकर्षक व रंगीत चित्राने युक्त असावे.
२.मलपृष्ठ : पुस्तकाचे वेस्टनाच्या अंतिम पुष्ठास मलपृष्ठ म्हणतात त्यावर किंमत असावी.
३.कागद : पांढरा व जाड असावा.
४.छपाई : स्पष्ट व योग्य दिसेल अशी असावी.
५.आकार : सहज हाताळता यावा असा असावा.
६.बांधणी : मजबुत व टिकावू असावी.
७.किंमत : सर्व सामान्य पालकांना परवडेल अशी असावी.

२.पाठ्यपुस्तकाचे अंतरंग निकष :
१.प्रस्तावना : प्रत्येक पाठाची मोजक्या शब्दात असावी.
२.साहित्य व प्रकार : विद्यार्थांच्या आवडीनुसार कथा ,नाटके .
३.शब्द संपत्ती : पाठाच्या शेवटी कठीण शब्दाचे अर्थ स्पष्ट करावे.
४.चित्र ,रेखा,छायाचित्रे : आकर्षक असावे.
५.टिपा : प्रत्येक शब्दाच्या शेवटी टिपा असाव्यात .
६.भाषा : विद्यार्थांचे वयानुसार असावी.
७.स्वाध्याय : प्रत्येक पाठच्या शेवटी स्वाध्याय दिलेला असावा.


५.पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण गट पद्धतीने करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.ग्रामीण भागातील व शहरी भागातील शिक्षकांने एकत्र येऊन पाठ्यपुस्तकाचे परीक्षण केल्यास त्यात अधिक वस्तुनिष्ठता येण्यास मदत होईल .
२.मातृभाषेच्या काही पाठातून कौटुंबिक भावना व गुरु भक्ती ह्या गोष्टी कळतात .
३.परस्पर सहकार्य व पालकांची आज्ञा पालन यातून सामाजिक विकास होतो.
४.पराप्रांताबद्दल आत्मीयता अंधश्रद्धा निर्मुलन याद्वारे मानवतेचे महत्व कळते.

६.शिक्षक हस्तपुस्तिका :
महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाने शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी हस्तपुस्तिका काढले आहे.
१.विद्यार्थांत उद्दिष्टे साध्या करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन मिळते.
२.विद्यार्थांना शिकवण्याची दिशा कळते.
३.विद्यार्थां मधील उद्दिष्टे साध्या करण्यासाठी घटक –उपघटक यांची दिशा कळते.
४.मुख्यघटकांचा उपघटकाशी संबंध जोडता येतो.
५.चाचणी घेण्याचे मार्गदर्शन मिळते.
६.पाठाच्या अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्य वापरण्याचे मार्गदर्शन मिळते.
७.विद्यार्थांचे मुल्यमापन करण्याचे मार्गदर्शन मिळते.
८.हस्पुस्तिका ही शिक्षकांजवळ असणाऱ्या ज्ञानाला पृष्टी देते.

मुख्य पृष्ठ